General news

पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर

पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, मार्गदर्शक राजकुमार शहापूरकर,अशोक गोडगे, महेश खिस्ते, संजय पवार, रवि लव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

या प्रसंगी पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अपराजित सर्वगोड, कार्याध्यक्षपदी माऊली डांगे, उपाध्यक्षपदी संजय कोकरे, सचिवपदी सचिन कुलकर्णी, खजिनदारपदी दगडू कांबळे, प्रसिद्धीप्रमुख सुदर्शन खंदारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

निवडीनंतर नूतन अध्यक्ष अपराजित सर्वगोड यांनी पुढील काळात विविध सामाजिक उपक्रम, पत्रकारांची कार्यशाळा,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान याचबरोबर पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास उपस्थित पत्रकार बांधवांना दिला.

यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष जाकीर नदाफ,विकास पवार, सचिन कांबळे, सचिन झाडे,अमीन शेख, यशवंत कुंभार,अमोल गुरव,गणेश महामुनी,राजू मिसाळ, प्रकाश सरताळे, प्रताप वाघ, कबीर देवकुळे, नूतन सदस्य सचिन माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *