थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०६/२०२४- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.१२ जुन २०२४ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) म्हणून मान्यताही मिळालेली आहे.

या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवार, दि.०३ जुलै २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांनी दिली.

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया बुधवार,दि.१२ जुन २०२४ पासून ते बुधवार, दि.०३ जुलै २०२४ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि कन्फर्मेशन करणे आदी प्रक्रिया चालतील. रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.पदविका अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग- रु.४०६/- आणि इतर प्रवर्ग- रु.३०६/- असे आहे.रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी.

प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा (पदविका) च्या प्रवेशाचा लाभ बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी प्रा.सचिन तोरणे मो.नं.-९८६००२४९९३ व प्रा.आकाश पवार मो.नं.-९५११२०८१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading