General news

तुळशी वृंदावन उद्यान 8 जानेवारी पासून खुले करण्यात येणार -वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ

तुळशी वृंदावन उद्यान 8 जानेवारीपासून खुले करण्यात येणार -वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ

पंढरपूर ,दि.02 – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांसह स्थानिक नागरिक, पर्यटक यमाई तलाव परिसर येथील तुळशी वृंदावन उद्यान पाहण्यासाठी येतात.

तुळशी वृंदावन उद्यान देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते. तुळशी वृंदावन उद्यानातील कामे पुर्ण झाल्याने दि.8 जानेवारी 2024 पासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली आहे.

तुळशी वृंदावन उद्यान पंढरपूर येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना तसेच अबालवृध्दांना आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. तुळशी वृंदावन उद्यान दुरुस्तीसाठी बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *