हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस This government will fall under its own weight – Leader of Opposition Devendra Fadnavis

मुंबई – सत्तेत पुन्हा येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नसून हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्यासंदर्भात बोलताना सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ,असेही फडणवीस म्हणाले.

आम्ही विरोधी पक्षात आहोत,तो पर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार
विधिमंडळाचे अधिवेशन ठरवण्याबाबतच्या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्या संदर्भातील वक्तव्य केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.आम्ही जनतेला जबाबदार आहोत. सत्तेत येण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. देशाच्या ७० ते ७२ वर्षांच्या कालखंडात अशा प्रकारची सरकारे चाललेली आपण पाहिलेले नाही. मात्र, हे सरकार आम्ही पाडणार नाही, तर हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल. जो पर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत, तो पर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहोत.

 महाविकास आघाडी सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये सुसंवाद दिसत नाही.त्यांच्यात विसंवादच आहे. त्यांचा आता एकमेकांवर विश्वासही राहिलेला नाही,मात्र या भानगडींमध्ये राज्यातील जनतेला का भरडता आहात. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला किंवा एकमेकांच्या गळात गळे घाला, मात्र तुम्ही जनतेला भरडू नका, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

मात्र जनता सरकारवर नाराज आहे हे नक्की

महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहे की नाही ते मला माहीत नाही, मात्र जनता सरकारवर नाराज आहे हे नक्की असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: