State news

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्या चिमुकल्या पंखांना उडण्याचं बळ देत तिच्या सक्षमीकरणाचा निर्धार करूया – सौ.अंजलीताई समाधान आवताडे

ती च्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, पंखांना बळ देण्यासाठी संकल्पबद्ध होऊया..

ती ला सक्षम करूया….

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्या चिमुकल्या पंखांना उडण्याचं बळ देत, तिच्या सक्षमीकरणाचा निर्धार करूया – सौ. अंजलीताई समाधान आवताडे

रांझणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२४ – आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे औचित्य साधत इयत्ता ५वी ते ७वी पर्यंतच्या मुलींचा किशोरी हितगुज मेळावा पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याच्या अध्यक्षा महिला नेत्या सौ.अंजलीताई आवताडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या फोटोस हार घालत अभिवादन केले. मुलींच्या शिक्षणातील संधी व कायद्याचे सरंक्षण तसेच सक्षमीकरण या विषयावर विचार व्यक्त केले आणि किशोरींसमवेत हितगुज साधले.

जगण्याचा व शिक्षणाचा समान अधिकार व संधी या आजच्या बालिकांना दिली तर उद्याच्या कर्तृत्ववान स्त्रिया भारताला लाभतील तसेच शिकतील आणि सक्षम होतील,मुली जगाचे भविष्य घडवतील हा विचार व्यक्त करत तीच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि डोळ्यातलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कार्यरत राहणं आपलं कर्तव्य आहे हे आवाहन देखील महिला नेत्या सौ. अंजलीताई आवताडे यांनी यावेळी केले.

विठु रखुमाई ,प्रत्येक लेकीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देवो ही प्रार्थना करत,या निरागस डोळ्यांतील हास्य आणि स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करत तो सिद्ध करण्याचे आवाहन करत, अखंड चैतन्याचा झरा असलेल्या सर्व बालिकांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सौ.सीमाताई प्रशांत परिचारक,जि. प.स.वसंत देशमुख,पंडितराव भोसले, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,सरपंच सौ.स्वातीताई श्रीमंत दांडगे,व्यवस्थापन अध्यक्ष स्वप्नाली सिताराम दांडगे, उपाध्यक्ष संगीता विठ्ठल दांडगे, मुख्याध्यापक खुळपे मॅडम,चेअरमन भारत दांडगे,उपसरपंच मारुती भाकरे,साहेबराव ढोले,महादेव ढोले, किसन भुताडे,कुंडलिक सुरवसे,हेमंत दांडगे, सिताराम दांडगे ,महादेव सप्ताळ, आनंद कांबळे, दिगंबर मोरे,गणेश घाडगे, बापू दांडगे, बंडू शिंदे,महादेव घाडगे,धनाजी पवार, बिभिषण बोरगावे, अभिजीत माने, योगेश दांडगे, अशोक घोडके, अकबर मुलाणी, विठ्ठल दांडगे, दादासो घायाळ , आनंद कांबळे,गणेश पंडित, समाधान सप्ताळ, लक्ष्मण गांडुळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व व्यवस्थापन सदस्य व ग्रामस्थ किशोरवयीन मुली तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि प्रतिष्ठित नागरीक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *