क्रीडा न्यूज sports

शरीर आणि मन मजबूत व्हायचे असेल तर खेळ खेळले पाहिजेत – अँड.अमोल देसाई

श्री माताजी निर्मला देवी प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्या मंदीर शाळेत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पंढरपुरातील अँड.अमोल देसाई व उद्योजक हेमंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अँड.अमोल देसाई म्हणाले की ,मुलांनी खेळाचा आनंद घ्यावा .आपले शरीर आणि मन मजबूत व्हायचे असेल तर खेळ खेळले पाहिजेत. क्रीडांगण आपणाला जीवन शिक्षण देते.

हेमंत कुलकर्णी यांनी, मुलांना दररोज किमान एक तास तरी मैदानावर घालवण्याचे आवाहन करताना खेळ व अभ्यासाची सांगड घातली तरच आपण यशस्वी होऊ शकतो ,असे सांगितले.

मुख्याध्यापक संतोष कवडे सर यांनी पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश भोसले सर, अशपाक मुजावर सर, दिनेश आगावणे सर , सोमनाथ साळुंखे सर ,सौ कदम मॅडम ,जगदाळे मॅडम यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *