महुद येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण Tree planting on the occasion of Shiv Sena anniversary at Mahud
महूद ,ता.सांगोला- शिवसेना वर्धापन दिना निमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या शिकवणुकीतून शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - युवासेना,शिवसेना महिला आघाडी सांगोला व शिवसेना शाखा महुद यांच्या वतीने महुद येथे भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पंढरपूर विभाग शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्या हस्ते वड, पिंपळ अशा झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,माजी उपतालुका प्रमुख नितीन वडे , उपतालुकाप्रमुख गणेश कांबळे, युवासेना समन्वयक शंकर मेटकरी, शिवसेना विभाग प्रमुख संतोष खडतरे, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख अस्लम मुलाणी,युवा सेना उपतालुका प्रमुख ऋतिक वडे आदिसह शिवसैनिक उपस्थित होते.