दिन विशेष

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती साजरी

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती साजरी

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२४ – आज क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी युवराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन उमेश ललिता ज्योतीराम सासवडकर ,सचिव दत्तात्रय देवमारे व सदस्य ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

या कार्यक्रमांमध्ये अंधशाळेतील मुलांनी गीत म्हणत आणि ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत केलं.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंधशाळेचे मुख्याध्यापक संतोष बाराते यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमेश सासवडकर यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्या युवराज नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत आपणास आवश्यक ती आर्थिक, सामाजिक स्वरूपाची भरीव मदत करण्याची ग्वाही दिली.

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा प्रतिष्ठान पंढरपूरच्यावतीने घेण्यात आलेल्या मोफत आधार नाव नोंदणी व मतदान नाव नोंदणीमध्ये शाळेतील दोन विद्यार्थ्याचे आधार नंबर काढून देण्यात आले.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांनी सत्यशोधक युवा प्रतिष्ठानचे आभार मानले. उपस्थित पाहुण्यांचा मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश सासवडकर यांनी मुलांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त खाऊवाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *