श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्यावतीने जागतिक योग दिन

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने जागतिक योग दिन साजरा Celebration of World Yoga Day on behalf of Shri Vitthal Rukmini Yoga Pranayama Sanstha
पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दैनिक पंढरी संचार चे संपादक अनिरुद्ध बडवे यांच्या हस्ते पत्रकार नितिन शिंदे यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

   यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुनील वाळुजकर यांनी सांगितले की,पंढरपूर शहरांमधील नागरिक,पत्रकार,नोकरदार व व्यापारी या योगप्रेमी साधकांनी एकत्रित येऊन सुमारे 15 ते 16 लाख खर्च करून स्वखर्चातून हे योग भवन उभा केले आहे .यासाठी आमदार प्रशांत परिचारक ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक,नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक आणि अश्विन महाराज मनमाडकर यांच्या सहकार्यातून हे योग भवन उभा केले आहे.

 दररोज या ठिकाणी योग साधक आपली योग साधना सकाळी सहा ते आठ या वेळेत करत असतात. महिलांसाठी सुद्धा योग वर्ग व झुम्बा डान्स सारखे क्लास चालवले जातात. लवकरच या जागेत शहरातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व कराटे प्रेमी यांच्यासाठी लाठी काठी व कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

  यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत आगावणे यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून नुसते योग वर्ग न चालवता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्याबरोबरच वृक्षारोपण व आरोग्य व योग शिबिरे घेतली जातात. संस्थेमार्फत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे उपक्रम राबवून भाविष्यात जमिनीतील पाणी पातळी वाढविणे कामी मोठी लोकचळवळ उभा करणेचे संस्थेचे उद्दीष्ट आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कोडग यांनी आभार मानले. यावेळी चंदूलाल सुपेकर, रामलिंग कोष्टी, त्रिभुवन तारे,निस्सार शेख, गजेंद्र माने यांच्यासह सर्व योग साधक उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: