सहकारमंत्री यांना भेटून सहकार शिरोमणीच्या सभासदांवर अन्याय होऊ नये म्हणुन लक्ष घाला अशी केली मागणी

सहकारमंत्री यांना भेटून सहकार शिरोमणीच्या सभासदांवर अन्याय होऊ नये म्हणुन लक्ष घाला अशी केली मागणी He called on Co-operation Minister to ensure that no injustice is done to the members

पंढरपूर – मी ॲड.दिपक दामोदर पवार मु.पो. जैनवाडी ता. पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी, ता.पंढरपूर जि. सोलापूर कारखान्याचा क्रियाशील सभासद असून माजी संचालक म्हणून काम केलेले आहे. सन २०१६ मध्ये कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभा करून सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढलो आहे. मागील निवडणुकीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांनी जवळपास एक हजार सभासदांना ऐनवेळी बेकायदेशीरपणे कमी केले होते व त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता व निवडणुकीतील सभांमध्ये बोलताना ती नावे चुकून कमी झाली असून निवडणुकीनंतर त्या लोकांना सभासद करून घेतले जाईल असा शब्द देखील कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिलेला होता परंतु परत त्या लोकांना सभासद केले गेले नाही. हा पूर्व इतिहस पाहता आतादेखील निवडणूक जवळ आलेली आहे व परत एकदा कल्याणराव काळे व त्यांचे सहकारी मिळून गेल्या निवडणुकीमध्ये विरोधात मतदान केलेल्या अडीच – तीन हजार सभासदांपैकी एक हजार सभासद कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीची अंतर्गत माहिती मिळत आहे व ही अतिशय बेकायदेशीर बाब असून सभासदांना त्यांच्या हक्कापासून दूर करण्याचे षड्यंत्र आहे तरी आपण या बाबतीत लक्ष घालून सभासदांचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये याबाबत वेळीच उपाययोजना कराव्यात ही विनंती. सभासदांचे हक्कांचे रक्षण करणे करिता आम्हाला खालील माहिती कारखान्याकडून मिळणे गरजेचे आहे परंतु कारखान्याकडून ती आम्हाला दिली जात नाही तरी खालील नमुन्यातील माहिती आम्हाला मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावा ही विनंती.

१)आज असणार्‍या एकूण सभासदांची यादी आम्हाला मिळावी जेणेकरून त्यामध्ये काही अफरातफर केली गेली आहे काय याबाबतीत खात्री करून घेता येईल.

२) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९/२० चा तपासणी अहवाल (audit report) तपासला असता त्यामध्ये जवळपास १२०० सभासद वाढवले गेलेचे नमूद केलेले आहे व ते सभासद कार्यक्षेत्रा बाहेरील असून चुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून केवळ निवडणुकीसाठी त्यांना सभासदत्व दिले गेलेले आहे अशी ठोस माहिती आमच्याकडे आहे तरी ती देखील त्या वाढीव सभासदांची स्वतंत्र यादी आम्हास मिळावी .

३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर लि.भाळवणी कारखान्याच्या स्थापनेपासून अनेकांचे पैसे शेअर्स देतो म्हणून कारखान्याने घेतलेले आहेत परंतु त्या रकमा शेअर्स अनामत खात्यात जमा करून त्या लोकांना आजतागायत सभासद करून घेतलेले नाही तर अशा शेअर्स अनामत रकमा जमा असणार्‍या व्यक्तींची स्वतंत्र यादी देखील उपलब्ध करून द्यावी व त्या व्यक्तींना कायद्यानुसार सभासद करून घ्यावे.याबाबत दर वर्षीच्या तपासणी अहवालात शेरे मारले गेले आहेत परंतु कारखान्याने याबाबत कोणतेही कामकाज केलेले नाही.

  वरील तिन्ही विषय अतिशय महत्वाचे असून सभासदांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे आपण या तिन्ही विषया मध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाय योजना व कारवाई करावी असे निवेदन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांना  ॲड.दिपक दामोदर पवार मु.पो.जैनवाडी ता. पंढरपूर यांनी मंत्रालय मुंबई येथे दिले आहे.

   आता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी याबाबत माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी सभासदांकडून केली जात आहे.कारण या सर्व गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या आहेत त्यामुळे याचा खुलासा झाला तर सभासद वर्गात वाढणारा असंतोष कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: