General news

श्रीकांत शिंदे यांची क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे अंबाबाई पटांगणाला क्रीडा संकुलाचा दर्जा देवून स्टेडियम उभारण्याची मागणी

पंढरपुरातील अंबाबाई पटांगणाला क्रीडा संकुलाचा दर्जा देवून स्टेडियम उभारावे

राष्ट्रवादी युवकच्या श्रीकांत शिंदे यांची क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरामध्ये अनेक गुणवंत खेळाडू आहेत मात्र त्यांना हक्काचे क्रीडा संकुल अजूनही उपलब्ध झालेले नाही. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी केली जात आहे मात्र त्यास अजूनही यश आलेले नाही.सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण हे क्रीडा संकुल म्हणून खेळाडूंसाठी उपलब्ध करून देवून त्याला क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वी केली होती. पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये क्रिडांगणाला कुठेही जागा उपलब्ध नसल्याने आहे याच अंबाबाई पटांगणाला क्रीडा संकुलाचा दर्जा देवून तेथे भव्य स्टेडियम उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे म्हणाले की, पंढरपूर शहर व तालुक्याचा विचार केल्यास अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धेच्या माध्यमातून चमकत आहेत पण त्यांना स्वतंत्र असे क्रीडा संकुल नसल्याने त्यांना सराव करण्यासाठी अडचणी येत आहेत .त्यासाठी गुणवंत खेळाडूंना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशपातळीवर आपले नाव कमविण्यासाठी पंढरपुरात भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे पंढरपूरचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *