General newsदिन विशेष

पोलिस रेझिंग डे निमित्त जिल्ह्यात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी.श्रीकांत धिवरे

पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्ह्यात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – कायदे सल्लागार, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – जिल्हाभरात पोलिस दलातर्फे व पोलिस रेझिंग डे च्या निमित्ताने सायबर सुरक्षा मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांचा सायबर अवरनेस फौंडेशनचा सहभाग असणार आहे.या मोहिमे अंतर्गत नागरीकांना सायबर सुरक्षाविषयी वेगवेगळया माध्यमाने जागरुक करण्यात येणार आहे.

धुळे जिल्हयात नुतन पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या संकल्पनेनुसार ही मोहिम जिल्हयातील विविध कॉलेज, शाळेत व ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. जेणेकरुन आजची युवा पिढी ही आजच्या डिजीटल युगात सुरक्षित राहील. यासाठी पोलिस निरिक्षक धनंजय पाटील आणि सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी नुकतेच कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विद्यार्थी वर्गाला सायबर सुरक्षिततेबाबत माहिती दिली.

यावेळेस श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आपण के.बी.सी.लॉटरी फ्रॉड पासून सावधान राहावे व डिजीटल युगात आपण व आपले परिवार यांनी कशी सुरक्षितता बाळगावी या संदर्भात सांगितले. यावेळेस ॲड.चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना सायबर स्टॉकींग व सायबर बुलिंग बाबत सुरक्षिततेचे काही महत्वाच्या टिप्स दिल्या व मुलांनी ऑनलाईन गेमिंग पासून दूर राहावे व मैदानी खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले व आपल्यासोबत सायबर गुन्हा घडल्यास १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन केले. यावेळेस कॉन्स्टेबल दिलीप वसावे व प्रियंका देवरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हयांबाबत त्यांचे अनुभव शेअर केले. सायबर सुरक्षा व जनजागृती अभियान धुळे जिल्हयातील पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक किशोरजी काळे, उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी, सायबर सेलचे पोलिस निरिक्षक धनंजय पाटील व सायबर अवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.चैतन्य भंडारी यांच्या संकल्पनेप्रमाणे संपुर्ण धुळे जिल्हयात व ग्रामीण भागात पोलिस रेझिंग डे निमित्ताने राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *