General news

योग प्राचार्य योगपंडित अशोक ननवरे सर योगाचार्य पुरस्काराने सन्मानित

मागील ३३ वर्षे सोलापूर जिल्ह्यात तसेच राज्यभरात योग शास्त्राच्या प्रचार प्रसाराचे कार्य

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,०३/०१/२०२४ – योग विद्या धाम पंढरपूर चे शाखा प्रमुख व प्राचार्य,योगपंडित,योग प्राध्यापक अशोक ननवरे सरांना योगाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारत सरकार आयुष मंत्रालय व महाराष्ट्र शासन व कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्था योग विद्या गुरूकुल नाशिक संस्थेने सतराव्या राष्ट्रीय योग संमेलनात योगाचार्य हा सर्वोच्च पुरस्कार कुलगुरू डॉ.विश्वासराव मंडलिक गुरूजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अशोक ननवरे हे मागील ३३ वर्षे सोलापूर जिल्ह्यात तसेच राज्यभरात योग शास्त्राचा प्रचार प्रसाराचे कार्य करीत आहेत.सन २००५ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे योग शिक्षक पदविका अभ्यासकेंद्र सोलापूर जिल्ह्यात चालवत असून त्यांनी अनेक योग शिक्षक घडविले आहेत.योग,आयुर्वेद,निसर्ग उपचार या क्षेत्रात निरपेक्ष भावनेने त्यांचे कार्य सुरू असून योग संशोधन क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

योगाचार्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आल्याने योग विद्या धाम परिवारासह योग प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *