लॉकडाउनच्या काळा मध्ये माजी नगराध्यक्ष यांनी शेतीत मिळवले भरघोस उत्पन्न

लॉकडाउनच्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष यांनी शेतीत मिळवले भरघोस उत्पन्न During the lockdown, the former mayor made a fortune on agriculture
पंढरपूर  - लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांनी आपले लक्ष शेतीकडे वळविले आहे आणि यातून भरघोस उत्पन्न देखील मिळवले आहे. असाच अनभुव  पंढरपूरकराना आला .पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंबीची लागवड केली होती.वीस एकर शेतापैकी त्यांनी चार एकरात भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली . याकरिता उत्तम नियोजन आणि खत व्यवस्थापन करत त्यांनी त्यामधून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी या करिता सेंद्रिय खताचा वापर केला असून त्या करिता लागवडीपासून ते उत्पन्न येईपर्यंत डाळिंबाच्या बागेला आजपर्यंत तीन लाख रुपयांचा खर्च आला आणि त्यांना यातून पंधरा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

लक्ष्मण शिरसाट यांच्या बागेतील डाळिंब हे केरळ या ठिकाणी विक्रीसाठी गेले असून त्यांना त्या ठिकाणी 70 रुपये किलो असा उत्कृष्ट दर मिळाला आहे.यापुढेही यातून चांगले उत्पन्न मिळण्याची यांना अपेक्षा आहे. ही बाग फुलवण्या साठी त्यांचे चिरंजीव आरोग्य सभापती विक्रम शिरसाट व बबलू झिंजुरटे यांनी परिश्रम घेतले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: