राजकीय न्यूज

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयात सुरुवात

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयात दुपारी बारा वाजता सुरुवात झाली आहे. प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून दिव्यांगांना तीनचाकी सायकल, कम्युनिटी मेडिकल कीटचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दिव्यांगांना केवळ प्रवासासाठी नव्हे तर रोजगार निर्मितीचे एक साधन म्हणून पर्यावरणपूरक तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. यासाठी इन्व्हेन्शिया आणि अजंता या कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सहाय्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *