पंढरपूर तहसीलदारांनी केली वाळू साठ्यावर कारवाई

पंढरपूर तहसीलदारांनी केली वाळू साठ्यावर कारवाई Pandharpur tehsildar takes action on sand stock
पंढरपूर - आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे आणण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार दि. 23 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे.
आंबे -पोहोरगाव येथे 6 होड्या केल्या नष्ट तर 20 ब्रास वाळू केली जप्त
   तालुक्यातील मौजे आंबे व मौजे पोहोरगाव दरम्यानच्या भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा  सुरू होता. याची माहिती मिळताच तहसीलदार सुशील बेल्हेकर हे स्वतः कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पोहोरगाव येथे गेले होते. तेथे पाहणी केली असता वाळू उपसा करणारी लोक नदीपार करून आंबे हद्दीत गेले. तहसीलदार व कर्मचारी हे स्पीड बोटचा वापर करत नदीच्या पलीकडे आंबे या ठिकाणी पोहोचले. तेथे बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. अधिक पाहणी केली असता नदीपात्राबाहेर काठाला 1 लाख रुपये किंमतीचा 20 ब्रास वाळुचा साठा केलेला आढळून आला. वाळू उपसा करणार्‍या सहा बोटी नष्ट करण्यात आल्या तसेच वीस ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. सदर वाळू साठा शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे पाठवण्यात आला.

    या कारवाईत तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी संतोष सुरवसे, गणेश टीके, समीर मुजावर, रणजीत मोरे यांच्यासह तलाठी आणि कोतवाल सहभागी झाले होते.

अशीच कारवाई नियमित करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.कारण ही अवैध वाळू चोरी अनेक गुन्हेगार आणि गुन्ह्यांना जन्म देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: