दिन विशेष

कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्वतःत रुजवून समाजासाठी काम करणे आवश्यक… डॉ.नीलम गोऱ्हे

कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्वतःत रुजवून समाजासाठी काम करणे आवश्यक… डॉ.नीलम गोऱ्हे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्राच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्ताने दि: ३/१/२०२४ रोजी परिसंवाद व चर्चा सत्रांचे आयोजन

पुणे / डॉ अंकिता शहा , दि.०४ : स्त्री आधार केंद्रातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्राच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्ताने परिसंवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दि: ३/१/२०२४ रोजी या कार्यक्रम उद्घाटन समयी स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे तसेच स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शोभा कोठारी, मीना इनामदार आणि अपर्णा पाठक त्याचप्रमाणे कवियत्री डॉ.मृणालिनी पवार आणि पुण्याच्या विविध भागातून आलेल्या स्वयंसेवक महिला उपस्थित होत्या.

मानद अध्यक्षा डॉ.नीलमताई गोऱ्हे व्हिडीओ माध्यमातून संपर्क साधून म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्यासोबत शाळेचे काम करण्याबरोबर मुलींवरील अन्याय व अत्याचार, बालविवाह, हुंडाबळी प्रथा, मुलीना टाकून देणे, मुलगा नसेल तर महिलांवर बहिष्कार टाकणे या विरुद्धही काम केले.व सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामुळे मुलीना शिक्षणाची दारे उघडी झाली .

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री आधार केंद्राची स्थापना केली होती. संस्था गेली ४० वर्ष काम करत आहे. महिला शिक्षण, मुलीवरील अत्याचार व हिंसाविरोधात व त्यांना केससाठी कोर्टात मदत करणे तसेच विविध कायदे व धोरणे बदलण्यासाठी काम करणे इ. कामे संस्था करते आहे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ.गोऱ्हे पुढे बोलताना म्हणल्या की, कुणाशीही बोलताना किंवा कुणाचेही व्हिडिओ कॉल करताना सावधानी बाळगावी कारण की आपला चेहरा बदलून त्या जागी दुसऱ्याचा फोटो लावूनसुद्धा विविध फसवणुकीचा घटना घडत आहेत. ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष भेटून चौकशी करावी यापासून आपली फसवणूक होणार नाही. त्याचप्रमाणे विविध मंदिराच्या ठिकाणी व महिला जेथे जास्त करून उपस्थित असतात त्याठिकाणी जाऊन स्त्री आधार केंद्रातर्फे पत्रक वाटण्यात यावीत. नवीन वर्षाचा नवीन संकल्पबाबत शाश्वत विकास उद्दिष्टेबरोबर कार्यक्रमासाठी जागतिक महिला आयोगाचा ६८ व्या सत्रामध्ये १६ मार्च रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा विषय- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये सायबर क्राईममुळे स्त्री पुरुष समानतेचा प्रश्नावर तयार झालेली आव्हाने यात विविध देशातील महिला सहभागी होणार आहेत.

स्त्री आधार केंद्र विश्वस्त जेहलम जोशी यांनी सांगितले स्त्री आधार केंद्रास ४० वर्षे पूर्ण झाली हा आपला एक मोलाचा टप्पा आहे. ४० वर्षांपूर्वीही अत्याचार चालू होते आणि आत्ताही चालू आहेत पण अत्याचार प्रकार वेगवेगळे झालेले आहेत. सोशल मीडिया किंवा ए आय, डीपफेक व्हिडिओ ही अशी विविध चॅलेंजेस आपल्यासमोर आत्ता नवीन पिढीनुसार आहे. आपल्याला त्याप्रमाणे आपली कार्याची गती वाढवली पाहिजे. नव्या तंत्रांचे खूप फायदेही आहेत.आपण कोरोनामध्येसुद्धा ऑनलाईन कामे करू शकलो. नव्या समस्यांमुळे केस हाताळतांना आपल्याला वेगवेगळी साधने वापरावी लागणार आहेत.

त्याचप्रमाणे पुढे त्यांनी युनायटेड नेशन तर्फे होणारा ऑरेंज डे २५ नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत ऑरेंज डे चा १५ दिवसीय कार्यक्रम व दर महिन्याच्या २५ तारखेला शाश्वत विकास उद्दिष्टमधील एक मुद्दा घेऊन मिटिंग घेतली जाते याबद्दल सांगितले. या कार्यक्रमांसाठी वॉलेंटियर म्हणून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस तरी महिलांनी सहभाग घ्यावा व नवीन महिलांची नोंदणी करून घ्यावी.

डॉ. मृणालिनीताई पवार यांनी पुढे सावित्रीबाई फुले यांच्या व्यापक विचार मदत सामाजिक भाग व भ्रूणहत्या बद्दल तसेच प्लेगमध्ये सावित्रीबाई यांनी केलेली मदत याबद्दल सांगितले. पुढे त्यांनी स्वतःच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगितल्या.त्यांनी आठवीत असताना कविता लेखन चालू केले. पुढे त्यांनी पीएचडी केली.मधील काळात आणि 21 व्या वर्षी ‘एवलासा प्रवास’ पुस्तक प्रकाशन केले .२३ व्या वर्षी ‘मनातील माझा’ हे चारोळीचे पुस्तक आणि कोरोना काळामध्ये झेलम ताई यांच्या मदतीने ‘मनाची ही डोही’चे नीलमताईंच्या हस्ते पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले होते.
स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णाताई पाठक, मीनाताई इनामदार, शोभाताई कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले .आभार प्रदर्शन आश्लेषा खंडागळे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *