Pune Student Suicide: पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; समोर आलं ‘हे’ कारण


हायलाइट्स:

  • पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
  • अमर मोहिते असं विद्यार्थ्याचं नाव
  • पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडल्यामुळं होता नैराश्यात

पुणे: राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणार्‍या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अमर मोहिते (वय ३१) असं या तरुणाचं नाव आहे.

अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यानं अभ्यासासाठी अमर पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील विठ्ठल मंदिराजवळच्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. तिथंच त्यानं गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.

वाचा: पारनेर कारखाना विक्री: पोलीस म्हणतात, गुन्हा दाखल करता येणार नाही, कारण…

अमर हा पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता. त्याशिवाय, करोना काळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्यानंही तो सतत तणावात होता. त्याच तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. या प्रकरणी विश्राम बाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा: ‘फटे स्कॅम’ची व्याप्ती मोठी; डॉक्टर, पोलीस, पत्रकारांसह भले भले फसले!

गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. स्पर्धा परीक्षा सातत्यानं पुढं ढकलल्या जात असल्यानं मागील वर्षी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे. त्यामुळं पालकांची चिंता वाढली आहे.

वाचा: खासगी रुग्णालयांना तंबी; संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार कराल तर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: