Akhilesh Yadav : भाजपने योगींना आधीच घरी पाठवले!; अखिलेश यादव असे नेमके का म्हणाले?


हायलाइट्स:

  • भाजपने योगींना आधीच घरी पाठवले.
  • अखिलेश यादव यांची खोचक प्रतिक्रिया.
  • गोरखपूरमध्येही सपाचाच विजय होणार.

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. ( Akhilesh Yadav Vs Yogi Adityanath )

वाचा : भाजपची वेगळी चाल! योगी अयोध्येतून नाही, ‘या’ मतदारसंघातून लढणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातही भाजप आणि समाजवादी पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. अखिलेश यादव हे भाजपवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडे त्यांचा सारा रोख आहे. त्यामुळेच आज भाजपची १०५ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अखिलेश यांनी पहिला निशाणा योगींवर साधला. योगी नेमके कुठून लढणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्क लावले जात होते. मात्र त्यांना त्यांचं होमपिच गोरखपूरमधूनच पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यावरून अखिलेश यांनी बाण सोडला.

वाचा : भाजपचे दोन मंत्री, सहा आमदार सपात; ‘योगींच्या हातून कॅच सुटला, आता…’

‘योगी आदित्यनाथ यांच्याबाबत अनेक चर्चा होत्या. कुणी सांगत होतं ते मथुरेतून लढणार, कुणी म्हणत होतं प्रयागराज तर काहींनी देवबंदही सांगून टाकलं होतं. मात्र भाजपने योगींना गोरखपूरचं तिकीट देऊन आधीच घरी पाठवून दिलं आहे. भाजपच्या या निर्णयाने मला खूप आनंद झाला आहे’, अशी टोलेबाजी अखिलेश यांनी केली. योगी हे भाजपचे सदस्य नाहीत. त्यामुळेच त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यांनी आता तिकडेच राहावे. परत माघारी येऊ नये, असा टोलाही अखिलेश यांनी लगावला. योगींनी उत्तर प्रदेश सोडा पण गोरखपूरमध्येही काहीच काम केलेले नाही. त्यामुळे गोरखपूरमधील सर्व जागाही समाजवादी पक्षच जिंकणार, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केला. सपा विकासाचं राजकारण करत आहे आणि राज्यातील ८० टक्के जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळी सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचेही अखिलेश म्हणाले.

वाचा : तिकीट कापल्याने बसपा नेता ढसाढसा रडला!; ६७ लाख रुपये देऊनही…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: