कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी नियमांचे पालन करा- उपविभागीय पोलीस अधिकारी कदम

विना मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 803 जणांवर कारवाई 4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसुल

नियमांचे पालन करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांचे आवाहन

    पंढरपूर/नागेश आदापुरे - मागील काही दिवसांत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले.यामध्ये 10 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत तालुक्यात 803 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

   कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तसेच कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्या 387 जणांवर व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 446 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

   सदरची कारवाई पंढरपूर शहर पोलीस,पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली आहे.पोलीस निरिक्षक अरुण पवार, मिलींद पाटील, धनंजय जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी केली आहे.नागरिकांनी मास्क वापर करावा, सार्वजनीक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे व वाहतुक नियमांचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: