राजीनामा देताना विराटचं इमोशनल लेटर, सरतेशेवटी धोनीचे आभार, म्हणाला, ‘त्याच्यामुळेच…!’


मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतलाय. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळून भारतात परतला. या मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर धक्कादायकरित्या त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. हा राजीनामा देताना त्याने एक इमोशनल लेटर लिहिलं आहे. कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल त्याने बीसीसीआयचे आभार मानले. त्याबरोबरच त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे आभार मानायला देखील तो विसरला नाही. त्याला ज्याच्यामुळे भारतीय संघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली, त्या महेंद्रसिंग धोनीचे आभार त्याने पत्राच्या सरतेशेवटी मानले आहेत.

विराट कोहलीने आपल्या संदेशात लिहितो, “संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, पण मला ही संधी देण्यासाठी धोनीने माझं नाव सुचवलं, त्यासाठी त्याने मनापासून धन्यवाद!”, असं म्हणत विराटने आपल्या ट्विटमध्ये धोनीचा उल्लेख आवर्जून केला आहे.

धोनीबद्दल विराट काय म्हणाला?

महेंद्रसिंग धोनी… टी ट्वेन्टी, एकदिवसीय आणि २०१३ ची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकवून देणारा भारताचा कर्णधार… ज्याच्या नेतृत्वात भारताला कायम विजय दिसला.. त्याच धोनीने ३० डिसेंबर २०१४ साली अचानकपणे भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर आता पुढचा भारताचा कर्णधार कोण? अशी सगळ्यांनाच चिंता लागली. पण अशावेळी विराट कोहली पुढे आला. तो आला….. त्याने पाहिलं आणि जिंकलं… असंच त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीचं वर्णन करावं लागेल. कारण विराटने ६८ सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. ज्यामध्ये भारताने ४० वेळा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. १७ वेळा भारताला अपयश आलं तर ११ वेळा टेस्ट ड्रॉ करुन भारताने प्रतिस्पर्ध्यांना ताकद दाखवून दिली. पण हे सगळं शक्य झालं त्या एका व्यक्तीमुळे, ज्याचं वर्णन विराटने पत्राच्या सरतेशेवटी केलं आहे, तो व्यक्ती आहे, लिजेंड एम एस धोनी….!

“सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं नाव सुचवलं. त्याचे मनापासून आभार”, असं म्हणून विराटने आपल्या पत्राचा शेवट केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: