चालू लिफ्ट जमिनीवर कोसळली, दुर्घटनेत एक जण ठार, तीन जखमी


अहमदनगर : अहमदनगरच्या मार्केट यार्ड भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळून एक युवक ठार झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले.

या अपघातात शुभम झेंडे (वय १९) हा युवक ठार झाला. तर ओंकार निमसे (वय १९), प्रिया पवार (वय ४०) व शीतल चिमखडे (वय २५) हे तिघे जखमी झाले आहेत. नगर शहरात स्टेशन रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे. त्या इमारतीत हा अपघात झाला. ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. त्यावेळी लिफ्टमधून चौघे प्रवास करीत होते. त्यातील एक युवक जागीत ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी सुरू आहे. तिघा जखमींपैकी एकाला जिल्हा सरकारी रुग्णालयात, तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून अपघात कसा घडला, याची जबाबदारी कोणाची? हे निश्चित झाल्यावर योग्य तो गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: