Chinese Spying Case : चिनी गुप्तचरांना संवेदनशील माहिती पुरवली; ‘त्या’ पत्रकारावर मोठी कारवाई


हायलाइट्स:

  • चिनी गुप्तचरांना संवेदनशील माहिती पुरवली.
  • पत्रकार राजीव शर्मावर ईडीची मोठी कारवाई.
  • दिल्लीतील ४८.२१ लाखांची मालमत्ता जप्त.

नवी दिल्ली: चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या दिल्लीतील एका पत्रकारावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या पत्रकाराची दिल्लीतील मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य ४८.२१ लाख रुपये इतके आहे. सक्तवसुली संचालनालयाने या कारवाईबाबत आज माहिती दिली. ( ED Attaches Properties Of Journalist Rajeev Sharma )

वाचा : चन्नी, सिद्धू मैदानात; सोनू सूदची बहीण आणि या गायकालाही काँग्रेसचं तिकीट

ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत मुक्त पत्रकार राजीव शर्मा याच्यावर ही कारवाई केली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागात असलेली शर्मा याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले गेले असून त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी राजीव शर्मा याच्यावर २०२० मध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून १४ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाने गेल्या आठवड्यात त्याला जामीन मंजूर केला आहे.

वाचा : भाजपने योगींना आधीच घरी पाठवले!; अखिलेश यादव असे नेमके का म्हणाले?

पत्रकारावर नेमका काय आरोप?

चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना भारतीय सैन्याच्या तैनातीबाबत तसेच सीमेवरील रणनीतीबाबत अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा राजीव शर्मा याच्यावर आरोप आहे. शर्मावर ईडीनेही गुन्हा दाखल केला असून मनी लाँडरिंग प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. ईडीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार राजीव शर्मा याला मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिपालपूर भागातील एका बनावट कंपनीचंही यात बिंग फुटलं आहे. चिनी नागरिक झांग चेंग उर्फ सूरज, झांग लिक्सिया उर्फ उषा, किंग शी तसेच नेपाळी नागरिक शेर सिंह उर्फ राज बोहरा यांच्याकडून ही कंपनी चालवली जात होती. हे सर्वजण चिनी गुप्तचरांसाठी काम करत होते. या कंपनीच्या माध्यमातूनच राजीव शर्मा याला गोपनीय माहितीच्या बदल्यात पैसा पुरवण्यात आला. शर्मा याने शिताफीने ही सारी रक्कम आपल्या मित्राच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे. शर्मा याला या कंपनीने विदेश सैरही घडवली आहे.

वाचा : भाजपची वेगळी चाल! योगी अयोध्येतून नाही, ‘या’ मतदारसंघातून लढणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: