Kiran Mane Controversy: किरण माने प्रकरणावर गृह राज्यमंत्र्यांची परखड भूमिका; म्हणाले, महाराष्ट्राबाहेरच्या…


हायलाइट्स:

  • किरण माने प्रकरणावरून राजकीय गदारोळ
  • गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मांडली भूमिका
  • अधिकृत तक्रार आल्यास चौकशी करणार – शंभुराज देसाई

सातारा: सोशल मीडियावर सडेतोड राजकीय भूमिका मांडल्यानंतर लगेचच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना एका मालिकेतून काढण्याच्या स्टार प्रवाह वाहिनीच्या निर्णयानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माने यांना काढण्यामागे राजकारण नसल्याचं संबंधित वाहिनीनं स्पष्ट केलं आहे. मात्र, माने यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या संदर्भात आता भूमिका मांडली आहे.

साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘समाज माध्यमांवर काही भूमिका मांडली म्हणून एखाद्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकलं जात असेल किंवा त्याला काम थांबवण्यास सांगितलं जात असेल तर महाराष्ट्रातील मराठी कलाकारावर झालेला अन्याय आहे. आम्ही तो कधीही सहन करणार नाही, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला.

वाचा: अभिनेते किरण माने यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेनंतर म्हणाले…

‘आमच्या माहितीप्रमाणे किरण माने यांनी जी काही पोस्ट केली त्यात कुठल्या पक्षाचं किंवा व्यक्तीचं थेट नाव घेतलेलं नाही. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यांचा संदर्भ जोडून त्यांच्या विरोधात कृती करणं चुकीचं आहे. किरण माने यांच्यावर कारवाई करणारी वाहिनी ही अमराठी आहे. महाराष्ट्राबाहेरची ही वाहिनी आहे. त्यांनी आमच्या मराठी कलाकारावर अन्याय झाला तर सहन केलं जाणार नाही. मी स्वत: याबद्दल किरण माने यांच्याशी बोलणार आहे. त्यांची या संदर्भात काही अधिकृत तक्रार असेल तर त्या तक्रारीची दखल घेतली जाईल. राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करेल आणि चौकशीअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

वाचा: महिला पर्यटकांना घेऊन परतणाऱ्या बसच्या ड्रायव्हरला अचानक फिट आली आणि…

‘मुलगी झाले हो’ (Mulgi zali ho) या मालिकेत किरण माने हे प्रमुख भूमिकेत आहेत. प्रत्यक्षातील त्यांच्या स्वभावाप्रमाणेच मालिकेतही त्यांची भूमिका आहे. या भूमिकेमुळं व ठसकेबाज संवादांमुळं ते घराघरांत पोहोचले आहेत. सामाजिक व राजकीय विषयांवर ते सातत्याने आपली मते बेधडक शब्दांत मांडत असतात. यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही पोस्ट लिहिली होती. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या संदर्भातही त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: