पोलीस प्रशासन सदैव पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठिशी – पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते

पोलीस प्रशासन सदैव पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठिशी – पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते Police administration is always on the side of police personnel -gramin Superintendent of Police Tejaswi Satpute
पंढरपूर - हार्डवर्क व समाजासाठी रक्ताचे पाणी करत सतत सेवेसाठी तत्पर असणार्या पोलीस कर्मचार्यांच्या पाठिशी तेवढ्याच ठामपणे पोलीस प्रशासन उभे राहत असल्याचे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. त्या येथील श्री विठ्ठल पोलीस सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या भुमिपुजन समारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम Vikram Kadam , तहसिलदार सुशिल बेल्हेकर,ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किरण अवचर,राजेश देवरे,पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,शहरचे पोलीस निरीक्षक  अरुण पवार , बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.

ना नफा ना तोटा या तत्वावर पोलीस कर्मचार्यां साठी बांधल्या जात असलेल्या या गृहनिर्माण सोसायटीचा भुमिपुजन समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या सोसायटीसाठी प्रयत्न करणारे वामन यलमार,गजानन माळी,विशाल शिंदे यांचे अभिनंदन करुन या प्रकल्पाच्या गृहप्रवेशास मी हजर राहणार असल्याचे सांगितले.पारदर्शकता हे शिवधनुष्य असल्याने पोलीस कर्मचार्यांच्या या स्वप्नातील घराला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी बोलताना तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी या प्रकल्पाचा आदर्श इतर खात्यातील कर्मचार्यांनी घेण्याचे आवाहन केले. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी अश्वासन दिले. 

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंढरपूर विभागाचे  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशपाल खेडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वामन यलमार,गजानन माळी,विशाल शिंदे व सर्व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: