मराठवाड्याच्या चिंतेत भर! करोनाचा पॉझिटिव्ह रेट वाढला; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण


औरंगाबादः राज्यातील करोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेचे कारण ठरत असताना आता मराठवाड्यातील आकडा या चिंतेत आणखी भर टाकणारा ठरत आहे. कारण मराठवाड्याचा एकूण पॉझिटीव्ह रेट ११.१२ झाला आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्हा मराठवाड्यातील सर्वाधिक पॉझिटीव्ह रेट असलेला ठरला आहे.

मराठवाड्यात शनिवारी २ हजार ६५ रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेटचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट १८.२५ टक्के असून, जालना ३.६३, परभणी ३.०९, हिंगोली ४.१५, बीड २.८३, उस्मानाबाद १०.१४, लातूर २०.१६ असून, नांदेड जिल्ह्याचा सर्वाधिक २४.१७ टक्के पॉझिटीव्ह रेट आहे. तर मराठवाड्याचा एकूण पॉझिटीव्ह रेट ११.१२ आहे.

वाचाः … म्हणून लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतेय; आरोग्य विभागाने सांगितलं कारण

विभागात ओमायक्रॉनचे १९ रुग्ण…

मराठवाड्यात ओमायक्रॉनचे १९ रुग्ण समोर आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात १०, औरंगाबाद ३, नांदेड ३, लातूर २, जालना जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. १६ रुग्ण घरी परतले आहेत तर ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचाः डॉ. नीरज कदमला अटक; गर्भपात प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता

लहान मुलांभोवतीही करोनाचा विळखा

औरंगाबाद शहरातील दोन दिवसांची आकडेवारी पालकांची चिंता वाढवणारी आहे. शुक्रवारी शहरात ४०१ नवीन रुग्णांची भर पडली. त्यात ० ते १८ वयोगटातील ३४ जणांचा समावेश होता. ज्यात ० ते १४ वयोगटातील १३ जणांचा समावेश होता. शनिवारी शहरात ४२३ रुग्ण आढळुन आले. त्यात ० ते १८ वयोगटातील ३१ जणांचा समावेश होता. ज्यात ० ते १४ वयोगटातील १६ जणांचा समावेश होता.

वाचाः ‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: