covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…
दुसरीकडे, देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत एकूण ७,७४३ इतके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यातील काही अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.
लसीकरण मोहीमेला १ वर्ष, आरोग्य मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
देशात करोना व्हायरसपासून बचावासाठी सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ पासून शनिवारपर्यंत लसीचे १५६ कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात ९४ कोटी प्रौढ आणि १५ ते १८ वयोगटातील ७.४० कोटी किशोरवयीन आहेत. ही लोकसंख्या सध्या लसीकरणयोग्य एकूण लोकसंख्या १०१.४० कोटी आहे.
Omicron In India : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू!; ‘या’ स्टडी रिपोर्टने वाढवली देशाची चिंता
आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. यापैकी ६४.३१ टक्के म्हणजेच ६५.२१ कोटी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचवेळी ८९.१६ टक्के म्हणजेच ९०.४१ कोटी नागरिकांनी एक डोस घेतलेला आहे. अशाप्रकारे १०.९९ कोटी नागरिकांनी म्हणजेच जवळपास ११ कोटी नागरिकांनी लसीचा अद्याप एकही डोस घेतलेला नाही. २५.१९ कोटी नागरिकांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे. भारतातील लसीकरण मोहीम ही जगातील सर्वात यशस्वी मोहीम ठरल्याचा दावा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. covid vaccine : गुड न्यूज! ‘या’ स्वदेशी लसीच्या बूस्टर डोससमोर ओमिक्रॉन, डेल्टा भुईसपाट… कंपनीचा मोठा दावा