… म्हणून लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतेय; आरोग्य विभागाने सांगितलं कारण


हायलाइट्स:

  • लहान मुलं आजारी पडण्याचे प्रमाण वाढले
  • घरातील व्यक्तीकडूनच लहान मुलांना संसर्ग
  • करोनाचे नियम न पाळल्याचा बसतोय फटका

हिंगोली: मागील दहा ते बारा दिवसांपासून लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून येत आहेत. मोठ्या व्यक्तीकडून लहान मुलांना आजाराचा संसर्ग होत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास घरात सुद्धा मास्क वापरावा, असा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

सातत्याने वातावरणात बदल जाणवत असून आठवडाभरापासून गारवा वाढत आहे. यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. याचा फटका लहान मुलांनाही बसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील बाल रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेली बालके उपचारासाठी येत आहेत. विशेषता तीन ते चार वयोगटातील मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घरातील मोठी व्यक्ती आजारी असल्यास लहान मुलांपासून दूर राहावे.

वाचाः डॉ. नीरज कदमला अटक; गर्भपात प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता

मास्कचा वापर करावा, लहान मुलाला साधा ताप असला तरी त्यांची करोना चाचणी करून घ्यावी, लहान मुलांना उबदार कपडे घालावेत, मास्कचा वापर करावा, अंग पूर्णपणे झाकले जाईल, अशा पद्धतीने कपडे परिधान करावेत. या काळात लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचार करावेत. जितके लवकर उपचार तेवढाच फायद्याचे असल्याचे आरोग्य विभाग सल्ला देत आहे.

वाचाः ‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’

हिंगोली जिल्ह्यात मागील ४ दिवसापासून मोठ्या संख्येने सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. काल एकूण ३७ रुग्ण आढळून आले आहेत. आज घडीला एकूण १४९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर १५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वाचाः काय सांगता! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात करोना रुग्णांध्ये पुरुषांची संख्या अधिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: