प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मद्यप्राशन करुन चालवत होता एसटी बस, जेवणाच्या डब्यातही आढळली दारू


हायलाइट्स:

  • चालकाच्या जेवणाच्या डब्यात आढळली दारू
  • कळमनुरी घराच्या एसटी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
  • प्रवाशांनी दाखल केली तक्रार

हिंगोली: राज्यात सध्या एसटी महामंडळाचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पेटलेला असताना हिंगोलीच्या कळमनुरी आगारातील एका एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या बस चालकाविरुद्ध हिंगोली आगारांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

एसटी चालकाच्या जेवणाच्या डब्यातील दारूच्या बॉटलदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलनादरम्यान एसटी चालक कामावर रुजू होत नसल्यामुळे खासगी वाहन चालकांच्या ताब्यात एसटीचे स्टेरिंग देऊ नये अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मात्र अशी मागणी करणारे जीएसटी कर्मचारी मद्य प्राशन करून त्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाचाः मराठवाड्याच्या चिंतेत भर! करोनाचा पॉझिटिव्ह रेट वाढला; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये खासगी प्रवाशांच्या बस मधील ड्रायव्हरला फिट आल्यामुळे प्रसंगावधान दाखवत एका महिलेने स्टेरिंगचा ताबा मिळवत चालकाला रुग्णालयात दाखल करुन प्रवाशांनासुद्धा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं. दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.

वाचाः अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; राणा दाम्पत्य नजरकैदेत

सदरील बस ही हिंगोलीच्या कळमनुरी आगारातून परभणीच्या दिशेने निघाल्याची माहिती आगार प्रमुख यांनी दिली आहे. सद्या ही बस हिंगोलीच्या आगारामध्ये थांबवण्यात आली आहे. एम. एच. २०डी. ९९३२ असा या बसचा क्रमांक असुन नागोराव डुकरे असं या चालकाचे नाव आहे. बसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने ही तक्रार केली आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

वाचाः … म्हणून लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतेय; आरोग्य विभागाने सांगितलं कारणSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: