Virat Kohli Vs BCCI:कोहलीच्या या निर्णयाची वाटच पाहत होती BCCI ; लगेच स्वीकारला राजीनामा


मुंबई : विराट कोहलीने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आणि क्रिकेट विश्व थक्क झाले. कोहलीने कसोटी क्रिकेट प्रकारात भारतीय संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले, पण असे असतानाही त्याने संघाचे कर्णधारपद लवकर सोडले. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, विराट कोहलीला एकदाही कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर विचार करण्यास सांगितले गेले नाही. विराटने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना कर्णधारपद सोडण्याबाबत कळवताच त्याचा निर्णय लगेच मान्य करण्यात आला.

वाचा- २४ वर्षीय खेळाडू होणार भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार; दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

द टेलिग्राफने असा दावा केला आहे की, ‘विराट कोहलीने शनिवारी दुपारी १ वाजता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले. कोहलीचे हे शब्द ऐकून गांगुली आणि शाह आश्चर्यचकित झाले, पण यावेळी त्यांनी त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले नाही.’

वाचा- टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

कर्णधारपद सोडण्याचा निर्णय कधी घेतला?
द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, ‘विराट कोहलीने आधीच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केपटाऊन कसोटी संपताच कोहली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली. कर्णधार म्हणून ही त्याची शेवटची कसोटी मालिका असेल, असा विचार कोहलीने या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच केला होता, असे म्हटले जाते. कर्णधारपदाची मोहीम त्याला विजय मिळवून करायची होती, पण तसे झाले नाही.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी हुकली
विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी होती, पण भारतीय संघाने ती गमावली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सेंच्युरियनमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला, पण त्यानंतर जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही सामन्यात फलंदाज अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कमी लक्ष्याचा पाठलाग सहजपणे केला. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकल्यानंतर कोहलीने कर्णधारपद सोडले असते, तर त्याच्या जबरदस्त मोहीमेचा विजयाने शेवट झाला असता, पण तसे घडले नाही. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही, हेही खरे आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: