पश्चिम विदर्भात कोरोनाचा धोका वाढला, आज नवे 972 कोरोनाबाधित, ‘या’ जिल्ह्याने टेन्शन वाढवलं!


अमरावती : राज्यात सण, समारंभ, उत्सव आणि राजकीय सभा सुरू होताच कोरोनाने सुद्धा आपले डोके वर काढले आहे. मध्यंतरी पश्चिम विदर्भाची रुग्ण संख्या ही अत्यंत कमी झाली होती. मात्र मागील आठवड्यापासून पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. यात अमरावती आणि अकोला जिल्हा अव्वल स्थानी असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 972 कोरोनाबाधित आढळून आले. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 245, अकोल्यात 291, यवतमाळमध्ये 157, बुलडाणा 217 आणि वाशिम येथे 62 असे एकूण 972 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रुग्ण संख्येच्या बाबतीत अकोला जिल्हा अव्वल स्थानी असून अमरावती जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्याची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजारांच्या वरतीच आहे. आज राज्यात 42 हजार 462 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. दुसरीकडे दिवसभरात 39 हजार 646 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुर्दैवाने राज्यात 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे राज्यात 125 रुग्ण ओमिक्रॉनबाधित आढळून आलेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: