शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं आणखी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल!, आता म्हणतात….


हिंगोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Shivsena MLA Santosh bangar Letter) यांचं पुन्हा एक पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हिंगोली पोलीस दलातील काही अधिकारी हेतुपुरस्पर लपणे मला लक्ष करून मानसिक त्रास देत आहेत, अशा आशयाचं त्यांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

संतोष बांगर यांच्या नावाने यापूर्वीसुद्धा असंच एक पत्र एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांच्या नावे लिहिण्यात आले होते. नंतर हे पत्र माझे नसल्याचे स्पष्टीकरण संतोष बांगर यांनी दिले होते .माझ्या पत्राचा कोणीतरी दुरुपयोग केला, असा खुलासा त्यांनी केला होता. या प्रकाराला अवघा एक आठवडासुद्दा उलटला नसून आमदार बांगर यांचं पुन्हा एक पत्र व्हायरल झालं आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या व्हायरल पत्रात नेमकं काय?

राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हिंगोली पोलीस दलातील काही अधिकारी हेतुपुरस्पर मला लक्ष करून मानसिक त्रास देत आहेत. अशा पोलिस अधिकाऱ्यांविरोधात लवकरात लवकर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा १८/०१/२०२२ रोजी मंगळवार, मी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आमरण उपोषणाला बसत आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.

हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक पंडित कचवे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांनी दिनांक १५/०१/२०२२ रोजी कसलीही पूर्वसूचना न देता माझ्या राहत्या घरी व स्व.बाळासाहेब ठाकरे व्यायाम शाळेमध्ये येऊन बेकायदेशीररीत्या माझी झडती घेतली. यादरम्यान सदरील पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या परिवारातील सदस्यांशी अरेरावीची भाषा करून मा सर्वांना आत टाकीन अशी धमकी दिली, असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आले आहे. मात्र या पत्रावर कुठलाही आवक जावक क्रमांक व तारीख सुद्धा दिसत नाहीये. त्यामुळे नक्की हे पत्र आमदारांनी दिलं की, पुन्हा त्यांच्या पत्राचा दुरुपयोग केला, हे अद्याप अस्पष्ट आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: