दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीता पुरस्कार आटपाडीचे सादिक खाटीक यांना जाहीर Darpankar Balshastri Jambhekar Journalism Award announced to Sadiq Khatik of Atpadi – केंद्रिय सचिव हाजी अब्दुलभाई शेख यांची माहीती
आटपाडी,दि .२४ / प्रतिनिधी- ऑल जर्नालिस्ट अँन्ड फ्रेंड सर्कलच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीता पुरस्कार आटपाडीचे सादिक खाटीक यांना जाहीर करण्यात आल्याची माहीती एजेएफसी चे केंद्रिय सचिव ज्येष्ठ पत्रकार हाजी अब्दुलभाई शेख यांनी दिली आहे .
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार घोषित झाल्याबद्दल खाटीक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रिय सचिव हाजी अब्दूलभाई शेख, प्रदेशाध्यक्ष दीपक नागरे बुलढाणा,सत्यवान विचारे राजापूर ,विजय सोनवणे अहमदनगर, नितीन गुंजाळकर अकोला ,महादेव अंकलगे रत्नागिरी ,घनःश्याम मानकामे विदर्भ, युयुत्सू आरते कोकण, गणेश गोडसे बार्शी , अतूल होनकळसे कराड , मंत्रालय प्रतिनिधी महादेव माने मुंबई, केंद्रीय खजिनदार विवेक म्हमाणे पाटील कोल्हापूर, विठ्ठल मोघे बार्शी, निलेश पोटे अकोला, हणमंतराव देसाई मराठवाडा, माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्य गोवेकर कराड, कासीम मिर्झा अमरावती, मराठवाडा अध्यक्ष कालीदास अनंतोजी, संघटनेचे प्रमुख सल्लागार ह.भ.प.बोरकर दादा कोकण, प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री झुल्फीकार काझी, घनःशाम मानकाने दौलत चौथाणी, अकोला अभिमन्यू लोंढे आदी मान्यवर ज्येष्ट पत्रकारांच्या निवड समिती, केंद्रीय समिती व विश्वस्तांनी काल झालेल्या मिटींगमध्ये दर्पणकार पुरस्कासाठी सादिक खाटीक यांची एकमताने निवड केली .
राष्ट्रीय पत्रकार दिनी १६ नोहेंबर रोजी अकोला येथे होत असलेल्या संघटनेच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचे हस्ते सादिक खाटीक यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे . दै.सागर चिपळूणचे माजी संपादक कै.निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी ज्येष्ट संपादक पत्रकार पुरस्कार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीता पुरस्कार, कै . मधुकर लोंढे ज्येष्ट वार्ताहर पुरुस्कार, यासह आणखी दोन पुरस्कारांचे वितरण अकोला येथे होणार आहे .
सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील माणदेशी आटपाडी तालुक्यातल्या सादिक खाटीक यांनी गेल्या ३६ वर्षात विविध क्षेत्रात मोठे काम केले आहे . राज्यातल्या विविध दैनिकातून ३२ वर्षे लक्षवेधी पत्रकारीता केलेल्या सादिक खाटीक यांचे वृतपत्र विश्वात मोठे काम आणि नाव आहे . ऑल जर्नालिस्ट अँन्ड फ्रेंडस सर्कल या पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असून मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.सादिक खाटीक यांनी ,शासन नियुक्त ग.दि.माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य म्हणून तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष, शेतकरी साहित्य इर्जिकचे सांगली जिल्हाध्यक्ष, व्यंकटेशतात्या माडगूळकर कथाकथन महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे . ते मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ही आहेत .राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निष्ठावान अनुयायी म्हणून सादिक खाटीक गत ३४ वर्षापासून ओळखले जातात .
सर्वच क्षेत्रातल्या शेकडो प्रश्नांची उत्तम जाण असणाऱ्या सादिक खाटीक यांनी आपल्या चतुरस्त्र कार्याचा आलेख सदैव उंचावत ठेवला आहे. सांगली,सातारा, सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी १९९२ साली डॉ. भारत पाटणकर, क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांना सर्वप्रथम आटपाडीत आणण्यात सादिक खाटीक यांची भूमिका इतर मान्यवरांबरोबर आघाडीची राहीली आहे . तालुक्यातील तसेच जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या विविध आंदोलनात सहभागी झालेल्या सादिक खाटीक यांनी पत्रकारांच्यावरील अन्याया विरोधात आवाज उठवण्याबरोबर पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका बजावली आहे . ९ ऑगस्ट क्रांती दिनी बहुसंख्य पत्रकारां समवेत केलेले, पावसाळ्यात कृष्णेतून समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यातील तलावांमधून सोडले जावे यासाठीचे यशस्वी आंदोलन केले आहे . सांगली आकाशवाणी वरून अनेक वेळा तालुका विकासपत्रे सादर करणाऱ्या सादिक यांचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने माणपत्राने गौरव करण्यात आला आहे . सांगलीचा प्रेरणा पुरस्कार, बेळगांवचा ग.गो. राजाध्यक्ष पत्रकारीता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पत्रपंडीत पां.वा.गाडगीळ पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सादिक खाटीक यापूर्वी गौरविले गेले आहेत.
Like this:
Like Loading...