राज्यातील करोना रुग्णांची संख्या झाली स्थिर?; अशी आहे आजची स्थिती
हायलाइट्स:
- रुग्णसंख्या ४० हजारांच्या आसपास स्थिर झाली?
- आज राज्यात ४१ हजार ३२७ नवीन रुग्णांचं निदान
- राज्यात आज ४० हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले
राज्यात आज ४० हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६८,००,९०० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.३ टक्के एवढं झालं आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१९,७४,३३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,११,८१० (१०.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,९८,४१४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात शनिवारी ४२ हजार ४६२ नवीन रुग्णांचं निदान झालं होतं, तर शुक्रवारी ४३ हजार २११ नवे रुग्ण आढळले होते.
राज्यात ओमिक्रॉन प्रादुर्भावाची काय आहे स्थिती?
महाराष्ट्रात आज ८ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ५ आणि पिंपरी चिंचवडमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १७३८ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.