‘शिवाजी चौक नाही…छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं; ‘या’ नगरपालिकेचा आदर्श पायंडा


औरंगाबाद : अनेक रस्ते, चौक, वस्त्यांना महापुरुषांचे नाव दिली गेली आहेत. या महापुरुषांचा आदर्श सर्वांपर्यंत पोहोचावा असा यामागचा हेतू असतो. मात्र अनेकदा या रस्त्यांचा, चौकांचा एकेरी नामोल्लेख केला जातो. मात्र आता यापुढे महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नयेत म्हणून औरंगाबादच्या गंगापूर नगरपालिकेने (Gangapur Nagarpalika) महत्वाचा निर्णय घेतला आहे.

विशिष्ट चौकाला महापुरुषांचे नाव दिल्यानंतर, त्या चौकांचा उल्लेख करताना बऱ्याचदा अनावधानाने महापुरुषांचा एकेरी उल्लेख करुन अवमान केला जातो. गंगापूर पालिकेने मात्र शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात महापुरुषांच्या नावे असलेल्या या चौकांचा एकेरी उल्लेख टाळावा, अशी होर्डिंग्ज लावले आहेत. तसेच दुकानदार व इतर व्यावसायिकांनी आपला पत्ता सांगताना लिहिताना या चौकांच्या पूर्ण आदरातिर्थी नावाचा उल्लेख करावा, असं आवाहन या होर्डिंग्जच्या माध्यमातून केलं आहे.

गंगापूर नगरपालिकेने हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असेच म्हणायचे, अशा आशयाचे बॅनर लावले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एका सकारात्मक मेसेज जात असून, महापुरुषांच्या नावाबद्दल एकेरी उल्लेख थांबवण्यासाठी जनजागृती सुद्धा होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: