उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’


मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी इच्छुक नसून, सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आता ‘शिवनेरी ते मुंबई’ असा ‘लॉंग मार्च’ काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा ‘लॉंग मार्च’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजेच प्रस्थापित मराठ्यांचं सरकार आहे. यामुळे सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार हलगर्जीपणा करत आहे. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला, शरद पवार यांचा बंगला सिल्वर ओक आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर लॉंग मार्च काढण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केरे यांनी दिली आहे. तसेच या बाबत सर्व नियोजन झाले असून, लवकरच तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल असेही केरे म्हणाले.

लॉंग मार्चची तयारी झाली असून, अनेक संघटनासोबत चर्चा झाली आहे. त्यासाठी पुढील आठ दिवसात राज्यव्यापी बैठक होणार आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर चालढकल करत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं केरे यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: