वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी MIM च्या माजी जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल; बीडमध्ये खळबळ


बीड : बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या गैरव्यवहारांची मालिका सुरुच आहे. एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख यांनी बीड शहरातील एक एकर 8 गुंठे जमीन हडप केल्याचा आरोप झालाय. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बीड शहराच्या मधोमध असलेली हीच ती जमीन आहे. या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करुन निजाम शेख यांनी सदर जमीन हडप केल्याचा आरोप वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

याप्रकरणी बीड शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाच्या मालमत्ता गैरव्यवहाराची चार प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून त्यात आणखी एकाची भर पडलीय.

दरम्यान, ही जमीन माझ्या वडिलोपार्जित असून मी कसलीही फसवणूक केली नाही. बीड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे माझ्यावर जाणीवपूर्वक राजकीय कारणांतून गुन्हा दाखल करण्यात आलाय, असा प्रतिआरोप एमआयएम नेते निजाम शेख यांनी केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: