आटपाडी तालुक्यातील बंदिस्त पाईप लाईनच्या उर्वरीत कामांसाठी सर्वांनी एकवटावे – आनंदराव पाटील

आटपाडी तालुक्यातील बंदिस्त पाईप लाईनच्या उर्वरीत कामांसाठी सर्वांनी एकवटावे – आनंदराव पाटील Everyone should unite for the remaining works of the closed pipeline in Atpadi taluka – Anandrao Patil
  आटपाडी, दि .२३/०६/२०२१/ प्रतिनिधी - आटपाडी तालुक्यातील बंदिस्त पाईपलाईनचे उर्वरीत गावातील काम तातडीने साकारण्यासाठी त्या गावातील शेतकऱ्यांनी एकजूट व्हावे ,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते तथा श्रमिक मुक्ती दल पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते आनंदरावबापु पाटील यांनी केले .

  कराड येथे दि .२५ जून रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात वरीष्ठ अधिकाऱ्यां समवेत समन्यायी पाणी वाटप संबंधाने होत असलेल्या महत्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीखूर्द, आंबेवाडी, लोणारवाडी, बोंबेवाडी येथील शेतकऱ्यांच्या बोंबेवाडीत घेतलेल्या तातडीच्या बैठकीत आनंदराव बापु पाटील हे बोलत होते .

  क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी,डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कृष्णेच्या पाण्याच्या लढ्याने आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १६ वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकालात संपूर्ण कृष्णा खोऱ्यासाठी दिलेल्या अमुल्य योगदानाने कृष्णामाई आज प्रत्येकाच्या शिवारात झेपावते आहे याकडे लक्ष वेधून आनंदराव बापु पाटील यांनी, देशात पहिलाच पथदर्शक प्रकल्प म्हणून साकारत असलेल्या बंदिस्त पाईपलाईनच्या प्रकल्पामुळे ६० टक्के पाण्याची बचत होणार असून कॅनॉलसाठी जमिन अधिग्रहणाचा बंदिस्त पाईपलाईनने प्रश्नच निकालात निघाला आहे . प्रत्येक कुटुंबाला मिळणाऱ्या ५००० घनमीटर पाण्याने जमीन असणाऱ्या बरोबर जमीन नसणाऱ्यांचा ही उत्कर्ष होणार आहे .केवळ दुष्काळग्रस्तांसाठीच जयंतराव पाटील यांनी महापुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्या तून दुष्काळी भागातले सर्व तलाव भरून घेण्याचा न्यायी उपक्रम अंमलात आणल्या बद्दल कृतज्ञता पूर्वक उल्लेख आनंदरावबापू पाटील यांनी शेवटी आपल्या भाषणात केला .

   जयंत पाटील यांच्यासारखा शक्तीशाली, अभ्यासू नेता आपणांस पालकमंत्री व जलसंपदा मंत्री म्हणून मिळाल्याने सांगली जिल्हा सर्व क्षेत्रात देशात अव्वल ठरणार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केला. 

   यावेळी बाळासाहेब जेडगे मिस्त्री,हणमंत कारंडे, विजय मेटकरी,धनाजी लवटे,वसंत अर्जुन, बी डी पाटील,संभाजी पुजारी,मारुती विभुते, अशोक विभुते,दत्ता मोटे, दिनकर कारंडे, भिमराव यमगर, राजेंद्र विभूते,डी .के.अर्जून सर, तुकाराम बंडगर,सोन्याबापू पुजारी,विजय अर्जून,डॉ.लक्ष्मण गाढवे, कैलास यमगर,अजित बंडगर,अमोल माने सर आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: