पेट्रोल-डिझेलचा भाव ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी इंधन दर जैसे थेच ठेवले.
  • देशात सलग ७५ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.
  • कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८६ डॉलरवर गेला.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी इंधन दर जैसे थेच ठेवले. देशात सलग ७५ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८६ डॉलरवर गेल्याने नजीकच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता आहे.

खूशखबर ; SBI आणि HDFC ने ठेवींवरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे दर
मुंबईत आज सोमवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सुसाट; जागतिक बँंकेने वर्तवला जीडीपीचा नवा अंदाज
एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.

PNB ग्राहकांनो इकडे लक्ष द्या; १५ जानेवारीपासून या सेवांसाठी द्यावे लागणार जास्त पैसे
सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरक कंपन्याकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे किरकोळ दर निश्चित केले जातात. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पंजाब आणि राजस्थान या राज्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक मूल्यवर्धित कर कमी केला आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात मागील आठवडाभर कच्च्या तेलाचा भाव तेजीत आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव १.०१ टक्क्यांनी वधारला आणि तो ८५.२४ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ८५.३२डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात १.०१ टक्के वाढ झाली आहे. एमसएक्सवर क्रूडचा भाव ४६ रुपयांनी वाढला आणि तो ६१२७ रुपये इतका झाला.

अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: