राजीनाम्यानंतर BCCIची मोठी ऑफर विराटने नाकारली; म्हणाला, काही फरक पडत नाही


नवी दिल्ली:विराट कोहली आता भारताचा कर्णधार राहिला नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा बेंगळुरू येथे कसोटी सामना होईल. हा विराटचा १००वा कसोटी सामना असेल. विराटला १००व्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्वकरून कर्णधारपद सोडता आले असते. पण त्याने असे केले नाही.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

हिंदुस्तान टाइन्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा विराट कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली तेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका सिनिअर अधिकाऱ्याने शुक्रवारी विराटला फोन करून कर्णधार म्हणून निरोपाची मॅच बेंगळुरू येथे खेळण्याचा प्रस्ताव दिला होता.

वाचा-२४ वर्षीय खेळाडू होणार भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार; दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या मते, विराटने कर्णधार म्हणून निरोपाचा सामना खेळण्यास नकार दिला. विराटच्या मते एका सामन्याने काही फरक पडत नाही. विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या करिअरचा शेवट पराभवाने केला. भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिली मॅच बेंगळुरू येथे होईल. ही विराटची १००वी कसोटी मॅच असेल.

वाचा- ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मेलबर्न कसोटी ड्रॉ झाल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा धोनीने ९० कसोटी सामने खेळले होते. कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडताना धोनीचे आभार मानले. धोनीने माझ्यात कर्णधार म्हणून विश्वास दाखवला होता.

वाचा- तू पुढच्या कर्णधारासाठी डोकेदुखी सोडली आहे

वनडे प्रमाणे कसोटीतील कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता होती. द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील पराभवानंतर याची शक्यता अधिक वाटत होती. बोर्डाने वनडेचे कर्णधारपद काढून घेतले होते त्याच प्रमाणे कसोटीचे देखील काढून घेण्याआधी विराटने आता माझ्यासाठी थांबण्याची वेळ आली आहे असे म्हटले. विराटच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला असला तरी गेल्या काही महिन्यातील घटनाक्रम पाहता विराटचा निर्णय योग्य म्हणावा लागले. आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. त्याआधी विराटने फक्त टी-२०चे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले होते. वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने वनडेचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली आणि विराटला देखील संदेश दिला की खरे बॉस तेच आहेत.विराटने ६८ कसोटीत भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ४० कसोटी संघाला विजय मिळवून दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: