omicron : मोठी बातमी : ओमिक्रॉनवर येतेय पहिली स्वदेशी लस, पुण्यातील मोठी कंपनी चर्चेत


नवी दिल्ली : भारतात लवकरच करोनावरील पहिली मेसेंजर किंवा mRNA लस मिळणार आहे. जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स ही कंपनी लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करणार आहे. दुसरी चांगली बातमी म्हणजे हीच कंपनी विशेषतः ओमिक्रॉनवर लस ( covid vaccine on omicron ) विकसित केली आहे. यासाठी मेसेंजर प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात आला आहे.

पुण्यातील कंपनी करणार उत्पादन

महाराष्ट्रातील पुण्याच्या जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने अलिकडेच दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा औषध नियामकाला सोपवला आहे. SARS-CoV2 व्हायरसच्या डेल्टा वेरियंटवर विकसित केलेल्या या दोन-डोस mRNA लसीची दुसऱ्या टप्प्यात ३,००० नागरिकांवर चाचणी करण्यात आली आहे. कंपनी आता चाचणीचा तिसरा टप्पा देखील पूर्ण करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नियामकाच्या मंजुरीची कंपनीला प्रतीक्षा

कंपनीने लसीचे रिस्क मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले आहे. नियामकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुरेशा प्रमाणात लसीचे उत्पादन केले जाईल. नव्या लसीला नियामकाकडून मंजुरी मिळण्याचीही शक्यता नसते. अशा परिस्थितीत तयार केलेली लस वाया जाण्याचा धोका आहे. म्हणून लसीचे रिस्क मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येते.

दुसरीकडे, ओमिक्रॉनला लक्ष्य करणारी लस जीनोव्हा फार्मास्युटिकल्सच्या प्रयोगशाळेत विकसित केली गेली आहे. आणि आता प्रभाव आणि प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता शोधण्यासाठी लसीची मानवांवर चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

covid vaccine : केंद्र म्हणाले, ‘कोणालाही इच्छेविरुद्ध लस घेण्यास भाग पाडू शकत नाही’

mRNA प्लॅटफॉर्मवरून विकसित केलेली पहिली लस

करोनावरील नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. VK पॉल यांनी यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. mRNA प्लॅटफॉर्मवर करोनाची लस बनवणे ही देशासाठी मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे. विशेष बाब म्हणजे देशात सध्या असलेली कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर ही नवीन लस साठ्याशी सुसंगत असेल. mRNA प्लॅटफॉर्मवर एकदा लस तयार केल्यावर कोविडच नाही तर दुसरी लसही या प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे तयार केली जाईल, असे डॉ. पॉल म्हणाले.

Omicron Updates: ओमिक्रॉनची लागण सर्वांनाच होणार, पण…; करोनाबाबत सर्वात मोठा दावा

कंपनीत तयार होत असलेली ओमिक्रॉनवरील विशिष्ट लस देखील खूप खास आहे. कारण भविष्यात व्हायरसचा नवीन प्रकार समोर आल्यास तेव्हा लसमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कंपनीने सादर केलेल्या चाचणी डेटाचा अभ्यास करेल आणि लसीला मंजुरी द्यायची की नाही हे ठरवेल. करोना लसीवरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: