Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार


हायलाइट्स:

  • हल्लेखोर ब्रिटिश नागरिक असल्याचं समोर
  • अमेरिकी मेंदूतज्ज्ञ आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेसाठी हल्ला
  • आफिया सिद्दीकी मूळची पाकिस्तानी नागरिक

वृत्तसंस्था, कॉलिव्हिल :

अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील कॉलिव्हिल या शहरात एका अज्ञात बंदूकधाऱ्याने शनिवारी रात्री ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ सिनेगॉगमध्ये ओलीस धरलेल्या उर्वरित तीन भाविकंची फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) तुकडीने दहा तासांनंतर मुक्तता केली. हल्लेखोराला ठार मारण्यात आले.

‘सुरुवातीला या हल्लेखोराने सिनेगॉगमधील धर्मगुरूसह चार जणांना ओलिस ठेवले होते. त्यातील एकाची सहा तासांनंतर सुटका करण्यात आली,’ अशी माहिती काँग्रिग्रेशन बेथ इस्राईलने दिली. या ठिकाणी काही गोळीबाराचे आवाज ऐकू आले, असे काही साक्षीदारांनी सांगितले. ‘एफबीआय’ने हल्लेखोराबाबत माहिती देण्यास नकार दिला, पण हल्लेखोर ब्रिटिश नागरिक होता आणि त्याचा या कारवाईत मृत्यू झाला आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे.

शब्बतची प्रार्थना सुरू असताना मदतीचा पहिला कॉल आला. त्यानंतर सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी ‘स्वॅट’ तुकड्या सिनगॉग परिसरात पोहोचल्या. त्यानंतर ‘एफबीआय’ने हल्लेखोराशी वाटाघाटी सुरू केल्या. सध्या तुरुंगात असणाऱ्या एका महिलेशी बोलायचे आहे, असे हल्लेखोराने सांगितले. फेसबुक लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून हल्लेखोर आणि एफबीआय यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या.

M M Naravane: सीमेवरील स्थिती बदलू देणार नाही, लष्करप्रमुखांनी ठणकावलं
India-Nepal: भारताची सीमेबाबत भूमिका कायम, नेपाळला ‘मैत्रिपूर्ण’ समज
पाकिस्तानकडेही संशयाची सुई

पाकिस्तानी वंशाची अमेरिकी मेंदूतज्ज्ञ आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेसाठी हल्लेखोराने हा हल्ला केला होता, अशी मागणी हल्लेखोराने केली होती. हल्लेखोराचे नाव महंमद सिद्दीकी होते, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाइटने दिले आहे.

दहशतवादी कारवायांत सामील असल्याच्या आरोपावरून आफिया हिला ८६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ती सध्या कारागृहात आहे. महंमद सिद्दीकी हा आफियाचा भाऊ असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते, मात्र सिद्दीकी कुटुंबीयांनी ते फेटाळल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे कॉलिव्हिल येथील हल्ल्यामागे पाकिस्तानचा काही हात आहे, का याचाही तपास केला जात आहे.

कोण आहे आफिया सिद्दीकी?

आफिया सिद्दीकी मूळची पाकिस्तानी नागरिक आहे. तिने बोस्टनमधून मास्टर्स आणि पीएच डी मिळ‌वली आहे. अल् कायदाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तिला अफगाणिस्तानातील गझनी प्रांतात २००८मध्ये अटक करण्यात आली होती. तिला ‘लेडी अल् कायदा’ नावाने ओळखले जाते. तिची सुटका व्हावी, यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संसदीय व्यवहार सल्लागार बाबर अवान यांची नियुक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Omicron Variant: ‘ओमिक्रॉन’ सामान्य नाही! रुग्णसंख्येसहीत मृत्यूंच्या संख्येतही लक्षणीय वाढ
Teenage Pregnancies: करोना काळात हजारो अल्पवयीन मुलींना ‘गर्भधारणे’मुळे सोडावी लागली शाळा!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: