विराटने अहंकार सोडावा, एक फलंदाज म्हणून त्याला…; विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य


नवी दिल्ली: विराट कोहलीने शनिवारी भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात देशाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराटच्या राजीनाम्यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

वाचा- राजीनाम्यानंतर BCCIची मोठी ऑफर विराटने नाकारली; म्हणाला, काही फरक पडत नाही

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून दबावामध्ये दिसत होता. आता त्याने इगो सोडून द्यावा आणि नव्या कर्णधाराच्या खाली खेळायला हवे, असे कपिल देव म्हणाले. विराटने वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने मर्यादित षटकासाठी दोन कर्णधार असू नयेत असे सांगत वनडेचे कर्णधारपद देखील काढून घेतले आणि रोहितकडे टी-२०, वनडेचे कर्णधारपद सोपवले. या घडामोडीनंतर बोर्ड आणि विराट यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे वृत्त समोर येत होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

कपिल देव म्हणाले की, सुनील गावस्कर माझ्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. मी श्रीकांत आणि अझरूद्दीनच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे. माझ्यात कोणताही इगो नाही. विराटला देखील इगो सोडावा लागले आणि युवा खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळावे लागले. यामुळे त्याला आणि भारतीय क्रिकेटला फायदा होईल. विराटने नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करावे. एक फलंदाज म्हणून आपण विराटला गमवू शकत नाही.

वाचा-२४ वर्षीय खेळाडू होणार भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार; दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना देव म्हणाले, मी विराट कोहलीच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याने जेव्हापासून टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे तेव्हापासून तो फार वाईट काळातून पुढे जात आहे. तो काळजीत दिसतोय आणि त्याच्यावरचा दबाव देखील वाढलाय. त्याचा हा निर्णय अधिक मोकळेपणाने खेळण्यासाठी असू शकतो. विराटने इतका मोठा निर्णय घेण्याआधी नक्कीच विचार केला असेल. कदाचित तो आता कर्णधारपदाचा इतका आनंद घेत नसावा. संपूर्ण देशाने त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि शुभेच्छा दिल्या पाहिजेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: