राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने पंढरपूर तहसिलदारांना निवेदन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने पंढरपूर तहसिलदारांना निवेदन Statement to Pandharpur Tehsildar on behalf of National OBC Federation

पंढरपूर / प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तात्काळ ओबीसी जनगणना डाटा सादर करावा व आरक्षण पूर्ववत लागू होणेकामी कार्यवाही व्हावी तसेच ओबीसींच्या इतर मागण्यांचे निवेदन आज दि.२४ जून २०२१ रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने बारा बलुतेदार संघटनेचे नेते पंढरपूर परीट धोबी सेवा मंडळाचे शहराध्यक्ष व पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक विजय वरपे यांनी ओबीसी बांधवांना सोबत घेऊन पंढरपूरचे तहसीलदार यांना दिले.

 ओबीसींच्या मागण्यांबाबत शासनाने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे विजय वरपे यांनी सांगितले. यावेळी परीट धोबी सेवा मंडळ पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश ननवरे, युवक शहराध्यक्ष रामेश्वर सांळुखे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: