‘कर्णधारपद हा कोणाचा जन्मसिद्ध हक्क नाही’; विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर गौतम गंभीरने साधला निशाणा…


मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार नसल्याने विराटने वेगळे काही करण्याची गरज नाही, असे मत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले.

विराट कोहलीने टी-२० प्रकाराचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघ निवडकर्त्यांनी त्याची एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आणि रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनवर चर्चेवेळी गौतम गंभीरला एक प्रश्न विचारण्यात आला. ‘आपण नवीन कोहलीला पाहणार आहोत का?’ या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला की, ‘तुम्हाला नवीन काय पाहायचे आहे? कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध हक्क नाही. महेंद्रसिंह धोनीसारख्या लोकांनी विराट कोहलीला कर्णधारपद दिले, आणि तो स्वत: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. त्याने तीन आयसीसी ट्रॉफी आणि चार आयपीएल ट्रॉफीही जिंकल्या आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू गंभीर म्हणाला की, ‘कोहलीचे एकमेव लक्ष संघासाठी धावा आणि सामने जिंकण्यावर असले पाहिजे. जेव्हा तुम्ही भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहता, तेव्हा तुम्ही कर्णधार होण्याचे स्वप्न पाहत नाही. तुम्ही भारतासाठी सामने जिंकण्याचे स्वप्न पाहता. काहीही बदलत नाही, फक्त तुम्ही नाणेफेक करून क्षेत्ररक्षण लावणार नाही, पण तुमची ऊर्जा आणि तीव्रता तशीच राहिली पाहिजे. कारण देशासाठी खेळणे हा सन्मान आहे.’

गंभीर पुढे म्हणाला की, ‘संघाचा कर्णधार असताना तिसऱ्या क्रमांकावर खेळताना जी भूमिका पार पाडायचा, भरपूर धावा काढणे आणि डाव पुढे घेऊन जाणे, याच भूमिका त्याला पार पाडायच्या आहेत. जेव्हा रोहित शर्मासोबत के.एल. राहुल सलामीला येईल, तेव्हा कोहलीची भूमिका अजिबात बदलत नाही.’

विराटने कसोटी कर्णधारपदचाा राजीनामा दिल्यानंतर आता पुढे कोणाकडे भारताचे नेतृत्व जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.सध्याच्या घडीला तरी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल, असे दोन पर्याय भारतीय संघापुढे दिसत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: