बीडः मराठी पाट्यांसाठी आग्रह असताना नगरपालिकेला उर्दू नावाचे फलक


बीडः राज्यात मराठी नावांच्या पाट्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असतानाच मात्र बीडमध्ये शिवसेनेच्या अवाहनाला खो देण्यात आला आहे. बीड नागरपालिकेवर आज उर्दू नामफलक लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बीडचे नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. एकीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे उर्दू भाषेत नामफलक लावण्यात आल्याने बीडचे राजकारण तापले आहे.

नगरपरीषद अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर मात्र या उर्दू भाषेतील फलकासाठी या आधी काही समाजातील व्यक्तींनी नगर परीषदेवर उर्दू भाषेतील फलक लावण्याची मागणी केली होती. मात्र आत्तापर्यत नामफलकावर उर्दू करण्यात आलं नव्हतं. तसंच, हा फलक लावण्यात आल्याचं वृत्त माध्यमांमधून कळलं, असं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलं आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडुन माहिती देण्यात आलेली नाही.

वाचाः अकोलाः करोनाला दूर ठेवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितेने घेतला ‘हा’ निर्णय

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले या विषयी मला अधिक माहिती नाहीये. मात्र ठराव असा झालेला आहे पाट्या मराठीत मोठ्या अक्षरांमध्ये असायला पाहिजेत आणि इतर भाषेमध्ये नाव हे छोट्या आकाराचे त्या ठिकाणी लावण्याचे आदेश या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. जरी कुठे ईकडे तिकडे झाले असेल तर ते बदलण्यात येईल आणि पाट्या या मराठीतच लागतील, असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

वाचाः राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली, ‘या’ जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर

मात्र, आता नगरपरिषदेच्या या उर्दूच्या पाटीमुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये मतदारांकडून मत मिळवण्याचा फंडा तर नाही ना अशा अनेक चर्चांना जिल्ह्याभरात उधाण आले आहे. मात्र, आता नगरपालिकेवर उर्दूतील पाटी मोठ्या अक्षरात राहणार की लहान अक्षर होणार की मराठीतील नाव हे सगळ्यात मोठ्या अक्षरात होईल का? ही चर्चा बीड जिल्ह्यात आणि शहरभरात होऊ लागली आहे.

वाचाः मराठी पाट्यावरून राजकीय वातावरण पेटलं, शिवसेना-मनसेच्या श्रेयवादाच्या लढाईत एमआयएमची एन्ट्रीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: