punjab election date : पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, आयोगाने केली नव्या तारखेची घोषणा


नवी दिल्ली : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीची नवी तारीख घोषित करण्यात आली आहे. आता पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीवर आधी निवडणूक आयोगाने काँग्रेस, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेसची बैठक घेतली. बैठकीत निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर पक्षांची मागणी मान्य केली.

निवडणूक आयोगाने यापूर्वी पंजाबमध्ये मतदानाची तारीख १४ फेब्रुवारीला घोषित केली होती. पण १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती असल्याने राजकीय पक्षांनी निवडणुका काही दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक आयोगाला या संबंधी पत्र लिहिले होते. विधानसभा निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. १६ फेब्रुवारीला श्रीगुरु रविदास यांची जयंती असल्याने त्यांनी आयोगाला पत्र लिहिले होते. सीएम चन्नी यांनी निवडणुकीसाठी मतदानाची तारीख ६ दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीमागचे कारण काय?

पंजामधून या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गुरूच्या जन्मस्थानाला भेट देतात. त्यामुळे १४ फेब्रुवारीला मतदान आणि यूपीतील निवडणुकांमुळे भाविकांना तिथे पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे मतदानाची तारीख ६ दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी पंजाबमधील सर्वपक्षांनी केली होती.

charanjit singh channi : पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलणार? मुख्यमंत्री चन्नींनी केली ‘ही’ मागणी

सीएम चन्नी यांच्यानंतर भाजपनेही केली होती मागणी

भाजपनेही रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. भाजपनेही रविदास जयंतीचं कारण सांगितलं होतं. ‘पंजाबमध्ये जवळपास ३२ टक्के अनुसूचित जातीचे नागरिक आहेत. १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान बहुतांश लोक यूपीला जातील. यामुळे तो निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. हे पाहता मतदानाची तारीख ५ ते ६ दिवस पुढे ढकलावी, असं सीएम चन्नी आणि भाजपने पत्रात लिहिले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: