सामाजिक न्यूज

अतुल जिनदत्त शहा महाराष्ट्र जन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित

अतुल जिनदत्त शहा बारामती महाराष्ट्र जन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित

मुंबई – अतुल जिनदत्त शहा बारामती यांना विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवन, मुंबई येथे झालेल्‍या समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्‍यात आले.

समाजात ज्‍या व्‍यक्‍तींनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात लक्षणीय कार्य केले आहे अशा महनीय व्‍यक्‍तींच्‍या कार्याचा गौरव दरवर्षी सपना सुबोध सावजी ट्रस्टच्या वतीने करण्‍यात येतो.यामध्ये भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा,फिल्म अभिनेता सचिन पिळगावकर व अन्य विशेष प्रभूतीना व बारामती येथील चंदूकाका सराफ ज्वेल्स चे मालक व कुसुम व जिनदत्त शाह वेल्फेअर फाउंडेशन बारामती संचालित दयोदय गोशाळेचे अध्यक्ष अतुल शहा तसेच बारामती येथील डॉ दीप्ती सतीश पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी विविध क्षेत्रातील ३५ महनीय व्‍यक्‍तींची निवड करण्‍यात आली होती .

अतुल जिनदत्त शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे नियोजनबद्ध उपक्रम राबविले जातात.गोसेवा व गोमाता संरक्षणासाठी दयोदय गोशाळेची स्थापना करून गायींचे गोबर व गोमूत्रापासून स्वर्णामृतचे उत्पादन सेंद्रिय शेतीसाठी केले जाते. मानवाला आणि प्राण्यांना विषमुक्त अन्न मिळण्यासाठी यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मागील चार वर्षापासून हा उपक्रम राबवित आहेत.

Ekam / Sanskrit / cs music

याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करताना अतुल शहा म्हणाले की,परम पूजनीय आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असून या कार्यात सौ.संगीता अतुल शाह व माझे सर्व सहकारी यांचेही योगदान आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी,सपना सुबोध सावजी ट्रस्टचे अध्‍यक्ष डॉ.राहुल सावजी,सौ.संगीता अतुल शहा आदींसह मान्‍यवर उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *