weather forecast : शेतकऱ्यांनो सावधान! हवामान खात्याचा पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे आहे पावसाची शक्यता? वाचा…


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. शिखरांमध्ये हिमवृष्टी सुरूच आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) मोठा इशारा दिला आहे. देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळनाडूच्या किनारी भागात बुधवारपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. तर अनेक किनारी भागातही मुसळधार पावसाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत तिरुवल्लूर जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील अनेक भागात पावसानंतर चेन्नईमध्ये पारा घसरला आणि किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. उत्तर किनारपट्टी प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मंगळवारीही राज्यातील अनेक भागात हलका पाऊस पडेल, असे चेन्नईचे हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक बालचंद्रन यांनी सांगितले. खालच्या पातळीवरील पूर्वेकडील जोरदार वारे आणि वरच्या पातळीवरील पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे राज्यात पाऊस सुरू झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आंध्र प्रदेशात १७ जानेवारीपर्यंत किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे. तसंच पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणमध्येही पावसाची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील ४ ते ५ दिवसांत पाऊस पडू शकतो. याशिवाय ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा इशाराही हवामान खात्याने जारी केला आहे.

omicron : मोठी बातमी : ओमिक्रॉनवर येतेय पहिली स्वदेशी लस, पुण्यातील मोठी कंपनी चर्चेत

येत्या दोन दिवसांत दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रात्री आणि सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: