Cyber crime awaerness

राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे – ॲड.चैतन्य भंडारी

राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे – ॲड.चैतन्य भंडारी

Ekam / Sanskrit / cs music

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – अयोध्या येथे प्रभु श्रीराम विराजमान होण्याअगोदर त्यांच्या नावाने व्हॉटस ॲपवर फार मोठया प्रमाणावर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना गंडविण्याचा प्रकार सुरु केला आहे.यात सायबर गुन्हेगार हे नागरीकांना व्हॉटस ॲपव्दारे मॅसेज करतात की, प्रभुश्रीराम मंदिरच्या नावाने ॲप्लीकेशन आले आहे ते डाउनलोड करुन आपण प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याकरीता देणगी देवू शकतात किंवा नागरिकांना असे देखील सूचित करण्यात येते की, आपण ॲप डाउनलोड करुन किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करुन देखील मंदिरा संदर्भातली माहिती आपल्या मोबाईलवर मिळवू शकतात आणि हे सर्व केल्याने आपले मोबाईल हॅक होते किंवा आपले बँक खाते देखील रिकामे होण्याची शक्यता असते.

सर्वात महत्वपूर्ण बाब अशी की, प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याच्या नावाने असे कोणतेही ॲप्लीकेशन नाही किंवा त्यांचे कोणतेही पदाधिकारी / अधिकारी नागरिकांना ॲप्लीकेशन करण्यास सांगत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. तरी नागरिकांनी जर आपणास असे मॅसेज आले असतील तर त्याला रिपोर्ट करा किंवा त्याकडे दुर्लक्ष करा तसेच दिलेल्या लिंक वर क्लिक करणे टाळा तसेच ॲप्लीकेशन डाउनलोड करणे टाळा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचा काही गुन्हा घडला असेल तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *